हम गया नही जिंदा है
*हम गया नही जिंदा है* आज दत्तवाडी केंद्रात महाराजांच्या अस्तित्वाचा अनुभव आला. दर मंगळवारी मार्गदर्शन करणाऱ्या ताई सर्वांना सांगत असतात की ताई अनुभव सांगा किंवा मार्गदर्शन करा तसे नेहमी बोलत असतात तसे त्या आजही बोलल्या पण कोणी उठत नव्हते मग त्या एका 16 वर्षीय भूमी नावाच्या ताईला बोलल्या की तू अनुभव सांग तीही ऐकत नव्हती अचानक सोसाट्याचा वारा सुरु झाला व केंद्रात पाणी येऊ नये म्हणून लावलेल्या ताडपत्र्या हलू लागल्या जोराचा वारा असल्यामुळे त्याची झड आत बसलेल्या सेवेकरिंना ही लागली.आणि तेवढ्यात मार्गदर्शन करणाऱ्या ताईच्या तोंडातून आपसूक शब्द निघाले की आता तुम्हाला अनुभव सांगावा लागेल कारण आता महाराज चिडले आहे लगेच कोरे ताई उठल्या व त्यांनी अनुभव सांगितला नंतर भूमि ताईंनी सुद्धा आपला अनुभव सांगितला जसाजसा भूमी त्यांचा अनुभव संपत होता तसा तसा सर्व वारा कमी होऊन पाऊसही कमी झाला ज्या क्षणाला त्यांचा अनुभव संपला त्याच क्षणाला पाऊसही शांत झाला. व इतर कार्यक्रम संपून सर्व सेवेकरी घरी पोहचत नाही तोपर्यंत पाऊस आला च नाही दिनांक:- २७ जुलै २०२१